
लसीकरणासाठी शिक्षक परिषद करणार आत्मक्लेष
टाकळी ढोकेश्वर : पुणे, औरंगाबाद, जालना, नाशिक आदी जिल्ह्यांत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांचेही लसीकरण झाले. मात्र, नगर जिल्ह्यात संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन याबाबत गंभीर नाही. शिक्षक परिषद यासाठी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी सांगितले. (Teachers will hold a movement for vaccination)
हेही वाचा: सुटला पेच पण लागली ठेच, कुकडीचे आवर्तन येईल लवकरच
"सकाळ'शी बोलताना ठुबे म्हणाले, ""प्राथमिक शिक्षकांना कोरोनासंबंधित विविध प्रकारच्या नियुक्त्या महसूल व आरोग्य विभागाकडून बजावण्यात आल्या आहेत. शासनाने कोविडसंबंधी कामे करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे "फ्रंटलाइन वर्कर' म्हणून प्राधान्याने लसीकरण केले आहे. मात्र, प्राथमिक शिक्षक कोविडसंबंधी कुटुंब सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चेक पोस्ट, कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, डाटा एन्ट्री आदी ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविका यांच्या बरोबरीने काम करीत असूनही, केवळ "फ्रंटलाइन वर्कर' म्हणून संबोधित न केल्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण होऊ शकले नाही.
या बाबत शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते मंगळवारी (ता. 18) एक दिवसाचे आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. कोविडसंदर्भातील वेगवेगळ्या प्रकारच्या कामांचे आदेश प्रशासनाकडून बजावले जात आहेत. आजअखेर जिल्ह्यात 30 शिक्षक बांधवांना जीव गमवावा लागला आहे.
जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेपैकी कोणताही विभाग लसीकरणाशिवाय काम करीत नाही. घरोघरी जाऊन शिक्षक कुटुंब सर्वेक्षण करीत आहेत.'' आमच्या जिवाची तुम्हाला पर्वा नसेल, तर मग काम तरी कशाला देता, असा प्रश्न ठुबे यांनी विचारला आहे. विशेष मोहीम राबून शिक्षकांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करावे, असे ते म्हणाले.(Teachers will hold a movement for vaccination)
Web Title: Teachers Will Hold A Movement For
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..