सहायक पुरवठा अधिकारी पारनेरचे प्रभारी तहसीलदार | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर

अहमदनगर : सहायक पुरवठा अधिकारी पारनेरचे प्रभारी तहसीलदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर : ज्योती देवरे यांची १३ सप्टेंबरला बदली झाल्यापासून पारनेरचे तहसीलदारपद रिक्त होते. मागील महिन्यात नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला होता. मात्र, कोणतीच कामे होत नसल्याची लोकांची ओरड सुरू होती. याबाबत दैनिक सकाळने आवाज उठविल्यानंतर काल (ता. 18) नगरचे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर निकम यांच्याकडे पारनेरच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे.

हेही वाचा: अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत

वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जळगाव येथे बदली झाली. तेव्हापासून पूर्ण वेळ तहसीलदार मिळालेला नाही. गेल्या महिन्यात नव्याने पारनेर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून बदलून आलेल्या गणेश आढारी यांच्याकडे तहसीलदारपदाचा प्रभारी पदभार सोपविला. मात्र, त्यांनी ठरावीक सह्या करण्याशिवाय कोणतेच काम केले नाही. अनेक वेळा शैक्षणिक दाखलेसुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत. शेतकरी तसेच तहसील कार्यालयात असलेली नागरिकांची इतरही कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. त्यामुळे जनतेची मोठी कुचंबणा होत होती. याबाबत सकाळने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते.

loading image
go to top