एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत

अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील शिक्षितांना स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारली जाईल, असे मत उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

अहमदनगर शहर व नगर तालुका युवा सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर होते, तर व्यासपीठावर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा तालुका प्रमुख प्रवीण गोरे होते. आज जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

मंत्री सामंत म्हणाले, की शिवसेनेत व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व दिले जाते. मी मंत्री जरी असलो, तरी प्रथम शिवसैनिक आहे. कार्यक्रमात शिवसैनिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी विचारल्या पाहिजेत. शहर व तालुक्यातील युवा वर्गासाठी ३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्सची उभारणी करण्यात येईल. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी या इन्स्टिट्यूटची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

गाडे म्हणाले, की युवा शक्ती ही जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आहे. त्याबरोबरच गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे. जो संघटनेत चांगले काम करील, त्याला पक्ष अधिकाअधिक जबाबदारी देत आहे.

कोरगावकर म्हणाले, की नगर जिल्हा हा साखर व शिक्षणसम्राटांचा जिल्हा आहे. या सम्राटांपुढे आमचा शिवसैनिक तग धरून उभा आहे. सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाची प्रमुख ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वागत राजेंद्र भगत यांनी, प्रास्ताविक प्रकाश कुलट यांनी केले. आभार प्रवीण गोरे यांनी मानले.

loading image
go to top