जामखेड: तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.