'शनि' चा पहिला शनिवार सुनासुनाच; सोनई परिसरात कडकडीत लाॅकडाऊन

The temple at Shanishinganapur was closed for the first time on Saturday due to corona
The temple at Shanishinganapur was closed for the first time on Saturday due to corona

सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापुरच्या इतिहासात पहिल्यांदाच शनिचा वार शनिवार पुर्णपणे सुनासुना गेला. दिवसभरात एकही भाविक दर्शनासाठी फिरकला नसल्याचे चित्र पहिल्यादाच पाहण्यास मिळाले. विकेंडच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शुकशुकाट जाणवला.

मागील वर्षाच्या लाॅकडाऊनमध्ये शनिवारी कडक नियम असतानाही तुरळक भाविक दर्शनासाठी येतच होते. आज पहिल्यांदा शनिवारी एकही भाविक दर्शनासाठी गावात फिरकला नाही हे विशेष. कोरानासंसर्गाची स्थिती लक्षात घेवून मागील आठवड्यात येथील शनिमंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, असे असतानाही तुरळक भाविक कळसाच्या दर्शनासाठी येवून गेले. 

कोरोना संसर्गाची वाढलेली स्थिती लक्षात घेवून सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सरपंच धनंजय वाघ, सामाजिक कार्यकर्ते नितीन दरंदले सह ग्रामसमितीने शुक्रवारी सायंकाळी सोनई गाव व परिसरात पूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शनिशिंगणापुर व परिसरात सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल, माजी सरपंच बाळासाहेब बानकर यांनी बंदचे आवाहन केले होते. 

परिसरातील सर्व गावात रुग्णालय व औषधाचे दुकान वगळता सर्व व्यवसाय बंद होते. नगर औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी दिवसभर शुकशुकाट पाहण्यास मिळाला. रस्त्यावर अनावश्यक फिरत असलेल्या युवकांना पोलिसांनी 'मेरी आवाज सुनो' चा प्रसाद दिल्याने दुपारनंतर रस्त्यावर कुणीच फिरकताना दिसले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com