
चांदे : नेवासे तालुक्यातील चांदे-कुकाणा रस्त्यावरील पेट्रोलपंपा जवळील वळणावर झालेल्या अपघातात टेम्पोच्या धडकेत मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, कुकाण्याकडून चांद्याकडे येणाऱ्या टेम्पोची (एमएच ०२ सीई- ८१३७) दुचाकीस धडक बसली.