तांदळाचा टेम्पो पकडला, मात्र गुन्हा दाखल होईना; पोलिस, महसूल यंत्रणेचे एकमेकांकडे बोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The tempo of the rice was caught, but case not registered

Ahmednagar | तांदळाचा टेम्पो पकडला, मात्र गुन्हा दाखल होईना

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी रात्री तांदूळ घेऊन जाणारा टेम्पो पकडून पोलिस ठाण्यात आणला; परंतु त्या काही तास उलटूनही टेम्पोमालकावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती. टेम्पोतील तांदूळ रेशनिंगचा नाही, याचीही खातरजमा झाली नाही. याप्रकरणी पोलिस व महसूल विभाग दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने, या तांदळाच्या काळ्याबाजाराची साखळी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

पारगाव सुद्रिक फाटा येथील एका शीतकरणगृहाच्या ठिकाणी पोलिसांना तांदळाचा टेम्पो आढळला. संशय आल्याने तो ताब्यात घेतला. त्यापूर्वी टेम्पोचा चालक पळून गेल्याने, पोलिसांनी टेम्पो ठाण्यात आणून लावला. या टेम्पोतील तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, याची तपासणी होण्याबाबत तहसीलदारांना पत्र दिले, मात्र त्यांच्याकडून उशिरापर्यंत कुठलाही अभिप्राय आला नाही.

हेही वाचा: पात्र असूनही पोलिस भरतीत अपात्र ठरला; न्याय मिळेल का?

श्रीगोंद्यात मोठे रॅकेट कार्यरत...

तालुक्यात यापूर्वी रेशनिंगचा तांदूळ, गहू काळ्याबाजारात विकण्यासाठी नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रेशनिंगचे धान्य काळ्याबाजारात विकणारे मोठे रॅकेट तालुक्यात सक्रिय आहे. यात महसूल, पोलिस आणि काही सामाजिक कार्यकर्तेही गुंतलेले असल्याची चर्चा आहे. रेशनिंगचा माल तालुक्यातून वेगवेगळ्या भागांतून एकत्र केला जातो. संशयाला जागा नको म्हणून तो वेगळ्या गोण्यांत भरून पाठविला जातो. हे काम अतिशय सफाईदारपणे केले जाते.

''पोलिसांनी टेंम्पो पकडला त्याच वेळी गुन्हा दाखल करून चालक- मालकाला ताब्यात घ्यायला हवे होते. मला पोलिसांनी पत्र दिले. त्याला मी योग्य उत्तर देईन. हा तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, हे समजणार नाही.'' - मिलिंद कुलथे, तहसीलदार

हेही वाचा: रेशन दुकानातून आता चहा-कॉफीचीही विक्री

''माहिती मिळाल्याने आम्ही टेम्पो पकडला. त्यातील तांदूळ रेशनिंगचा आहे की नाही, हे तपासण्याचे काम आमचे नाही. तहसीलदारांचा लेखी खुलासा आल्यानंतर पुढची कारवाई करू.'' - रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक

loading image
go to top