रोहित पवारांच्या हाकेला जामखेडमध्ये दहा ग्रामपंचायतींची ओ

वसंत सानप
Monday, 4 January 2021

तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या

जामखेड : बिनविरोध निवडणूक व्हाव्यात, यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनाला तालुक्‍यातील दहा ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला. तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींपैकी दहा गावे आता त्यांच्या बक्षिसात पात्र ठरले आहेत.

तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या, तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. 

हेही वाचा - अण्णांच्या गावात दुफळी

तालुक्‍यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला 30 लाखांचा निधी मिळवून देऊ, असे आमदार रोहित पवार यांनी मागील आठवड्यात जाहीर केले होते. त्या अनुषंगाने तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींमधून 417 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यापैकी 116 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ 301 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये एक ते चार सदस्य बिनविरोध निवडून आलेल्या सतरा ग्रामपंचायती आहेत. त्यापेक्षा कमी सदस्य निवडून आलेल्या दोन ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे थेट निवडणूक वीस ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. 

तालुक्‍यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायवळ, प्रा. सचिन गायवळ, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे यांनी पुढाकार घेतला. 

महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे बिनविरोध उमेदवार असे ः सोनेगाव ः रुख्मिणी बिरंगळ, रुपाली बिरंगळ, सुनीता बोलभट, मनिषा वायकर, सूमन मिसाळ, मारूती बोलभट, विलास मिसाळ, आश्रू खोटे, अमोल वायकर. 

सातेफळ ः गणेश अजिनाथ लटके, रमेश ज्योती भोसले, काशिनाथ शाहू सदाफुले, जयश्री बापू थोरात, अलका मेघराज पाचरणे, नंदा दिगांबर खुपसे, जनाबाई मोहन भोसले. 

खुरदैठण ः अश्विनी बाळासाहेब ठाकरे, निर्मला गोकुळ डूचे, दादासाहेब शहाजी डूचे, मंदाबाई विठ्ठल डूचे, मनिषा अविनाश ठाकरे, हनुमान कुंडलिक देवकाते, सुनीता मोहन डुचे. 

धोंडपारगाव ः कैलास शिंदे, दत्ता शिंदे, बळीराम शिंदे, अवधुत शिंदे, दादा साळवे, अमोल शिंदे, रवि शिंदे. 
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten gram panchayats in Jamkhed respond to Rohit Pawar's call