दहा बरे झाले नि बारा नव्याने बाधले...पारनेर, नगर, अकोल्यात धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

संगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.

नगर : नगरमध्ये कोरोनाचा कहर थांबायला तयार नाही. कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण मोठे असले तरी त्याच्या तुलनेत नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्याही तेवढीच आहे. त्यामुळे ही धास्ती आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि मुंबईतून आलेल्या लोकांमुळे बाधा झाली आता जे बाधित आहेत, ते लोकांना बाधा निर्माण करीत आहेत. ही जिल्ह्याच्या दृष्टीने काळजीची गोष्ट आहे.

आज जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे.

हेही वाचा - मुद्रा लोनबाबत सरकारचा हा आहे नवा आदेश

दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.यामध्ये संगमनेर तालुक्यातील ०६, नगर शहरात ०४ तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

संगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.

नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता 

पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्ण संख्या आता ११३ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten were cured and twelve new corona patients