Ahilyanagar : अहिल्‍यानगर शहरासह तालुक्यातही ठाकरे सेनेला खिंडार; तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मोठ्या राजकीय घडामोडींमुळे शहर व तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांनी राजकीय खेळी करून पक्षाची ताकद वाढविण्यासह भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनिती आखली आहे.
Prominent Thackeray Sena leaders from Ahilyanagar taluka joining the Shinde group, signaling a major political change in the region.
Prominent Thackeray Sena leaders from Ahilyanagar taluka joining the Shinde group, signaling a major political change in the region.Sakal
Updated on

अहिल्यानगर : शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सर्वजण बुधवारी मुंबईकडे रवाना झाले. या पक्ष प्रवेशाने शहर आणि तालुक्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. शहराबरोबरच तालुक्यातही ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com