
आयुक्तांच्या परिपत्रकाचा वेगळा "अर्थ" लावत केलेली नियमबाह्य नियुक्ती अखेर रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
श्रीगोंदे : श्रीगोंदे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा तात्पुरता पदभार सगळे संकेत व नियम बाजूला ठेवून जामखेड येथील गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची चूक अखेर शिक्षण उपसंचालकांना समजली. 'सकाळ'ने हे प्रकरण उजेडात आणले. जिल्हा परिषद शिक्षण समितीत त्यावर वादळी चर्चा झाली. हा विषय थेट आयुक्तांपर्यंत गेला. अखेर नागनाथ शिंदे यांना एका दिवसाचे पाहुणे ठरवीत त्यांच्याकडचा पदभार येथील अनिल शिंदे यांच्याकडे देण्याचा आदेश आला.
श्रीगोंदे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी पद ३१ मे रोजी सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाले. त्यांच्या जागेवर जामखेड गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण आयुक्तांच्या परिपत्रकाचा वेगळा "अर्थ" लावत केलेली नियमबाह्य नियुक्ती अखेर रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. (The BEOs of Jamkhed relinquished their rights over Shrigonda)
या बाबत चार जून रोजी 'सकाळ'ने ही नियमबाह्य प्रभारी नियुक्तीचे प्रकरण उजेडात आणताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीत यावर वादळी चर्चा होऊन दोन ठराव करण्यात आले. ते शिक्षण आयुक्तांना पाठवण्यात आले.
आजवर अशा रिक्त पदांवर संबंधित कार्यालयातील ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे प्रभारी कार्यभार दिला जात असे. परंतु उकिरडे यांनी दिलेल्या नियमबाह्य प्रभारी नियुक्तीचे आदेश दोन दिवसात त्यांना बदलून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शिंदे यांच्याकडे द्यावे लागले.
शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १४ मे रोजी परिपत्रक काढून शिक्षण उपसंचालकांना दिलेले हे अधिकार रद्द करून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पूर्वी प्रमाणे देण्याबाबतचा ठराव आयुक्तांकडे पोचताच नागनाथ शिंदे यांचा प्रभारी कार्यभार रद्द झाला आहे. मात्र आता आयएएस दर्जाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे काढून घेतलेले अधिकार पुन्हा कधी बहाल केले जातात, याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(The BEOs of Jamkhed relinquished their rights over Shrigonda)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.