खूप झालं! पुण्याच्या नेत्यांविरोधात नगरचे शेतकरी एकवटले

कुकडीच्या पाण्यासाठी निघोजमध्ये बैठक
कुकडीसाठी निघोजमध्ये शेतकऱ्यांची बैठक
कुकडीसाठी निघोजमध्ये शेतकऱ्यांची बैठकई सकाळ

निघोज (अहमदनगर) : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील नेते मंडळीकडून होणारा अन्याय यापुढे आजिबात सहन करायचा नाही. आमचे हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, यासाठी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता राजकीय जोडे बाजुला ठेवून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्धार केला आहे. (The farmers of Ahmednagar got angry over the water of Kukd)

लाभक्षेत्राच्या प्रमाणात आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे यासाठी संघर्ष करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी आता कंबर कसली आहे. राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून लढा उभारुन कुकडीचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

जवळा ( ता.पारनेर) येथे आज पारनेर तालुक्यातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुकडीच्या पाणी वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याने यापुढे अन्याय सहन न करता हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

कुकडीचे आवर्तन लांबल्याने पारनेर तालुक्यातील शेतीपिके धोक्यात आली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे कोट्यवधी रुपयांची शेतीपिके धोक्यात आली. मात्र, कुकडीचे पाणी आता न्यायप्रविष्ट असल्याने ही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांकडून नेहमी अन्याय होत आहे.

कुकडीसाठी निघोजमध्ये शेतकऱ्यांची बैठक
शोकांतिका! कुटुंबातील तिघांना कोरोनाने नेले, घर चोरांनी लुटले!

राजकीय साठमारीत पारनेर तालुक्यातील शेतकरी नेहमीच वाऱ्यावर सोडले जातात. यामुळे भविष्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांची एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत सघंर्ष उभारताना राजकीय जोडे बाजुला ठेवून हा लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी सभापती गणेश शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे, लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे,अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल शिंदे, संदीप पाटील जनफौंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, माजी सरपंच ठकाराम लंके, कैलास शेळके, प्रदीप सोमवंशी, शिवाजी सालके, मंगेश सालके आदींनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी निघोज, जवळा, वाडेगव्हाण, राळेगण थेरपाळ,आदी लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

कुकडी कालवा सल्लागार समिती बरखास्त करा

कुकडीच्या पाणीवाटपाचे नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीवर राजकीय नेते मंडळी असल्याने पारनेर सह नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांवर नेहमी अज्ञाय होतो.हा अज्ञाय दुर करण्यासाठी कुकडी कालवा सल्लागार समिती बरखास्त करा अशी मागणी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी या बैठकीत केली.(The farmers of Ahmednagar got angry over the water of Kukd)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com