अहमदनगरमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 election

अहमदनगरमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (AHMEDNAGAR DISTRICT)पारनेर(PARNER), कर्जत(KARJAT) आणि अकोले(AKOLE) नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांचे आयोजन करत शक्‍तिप्रदर्शन केले. सोमवारचा दिवस आता प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यावर राहणार आहे. पारनेर, आणि अकोले नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ पैकी १३ जागांसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान होणार आहे, तर कर्जतची एक जागा बिनविरोध झाली असून, १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षणामुळे उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी १८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

हेही वाचा: शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी द्या - मनसेची मागणी

पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके(NILESH LANKE) आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी(VIJAY OUTI) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. माजी आमदार औटी यांच्या पत्नी व माजी सभापती जयश्री औटी यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य या निवडणुकीत मतपेटीत बंद होणार आहे. कर्जत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे(RAM SHINDE) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. अकोले नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे(DR. KIRAN LAHAMATE) व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. मंगळवारी मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात, याचा फैसला होणार आहे. लढती राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये होतील.

Web Title: The Guns Of Propaganda Cooled In Ahmednagar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AhmednagarAKOLA ELECTION