esakal | ऊसतोड कामगारांच्या झोपड्या जळून खाक

बोलून बातमी शोधा

The huts of the mula factory workers were burnt

ऊसतोड कामगारांच्या झोपड्या जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर): मुळा साखर कारखान्याच्या गट परीसरात राहत असलेल्या उसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या.सुरक्षा विभाग व ग्रामस्थांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

गट परीसरातील गट नंबर ८००/२ मध्ये पन्नासहून अधिक उसतोडणी कामगार राहतात. येथे आज सकाळी अकरा वाजता अचानक एका झोपडीला आग लागली. तेथील ग्रामस्थांनी कारखान्याच्या सुरक्षा विभागास खबर दिली.

आगीत सतेज मोरे व हिरा जगदाळे रा.उखळवाडी(जि.बीड) यांच्या दोन मोटारसायकली, धान्य,कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.बांधलेले जनावरे युवकांनी सोडून दिल्याने त्यांचा प्राण वाचला.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

'मुळा' चा अग्निशमन बंब तत्परतेने आल्याने मोठा अनर्थ टळला. सुरक्षाधिकारी प्रविण चौधरी,कर्मचारी टी.बी.भाकड,बी.एन.घावटे,एन.ए.घावटे,आर.बी.

जायगुडे सह तेथील शेतकरी लक्ष्मण दरंदले, विष्णू दरंदले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुसळकर, नागेश गर्जे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सुरक्षाधिकारी चौधरींचे कौतुक

बंधू नितीन चौधरी यांचे तीन दिवसापूर्वी निधन झाले असताना दु:ख बाजुला ठेवून सुरक्षाधिकारी चौधरी यांनी घराच्या बाहेर पडत आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. अग्निशमन बंब व इतर ठिकाणचे पाणी उपलब्ध करुन इतर पन्नासहून अधिक झोपड्या आगीपासून वाचविल्या.या विशेष कामगिरीचे कौतुक होत आहे.

बातमीदार - विनायक दरंदले