esakal | नगर तालुका लागला उताराला, कोरोना रूग्णसंख्या घटतेय

बोलून बातमी शोधा

कोरोना टेस्ट
नगर तालुका लागला उताराला, कोरोना रूग्णसंख्या घटतेय
sakal_logo
By
दत्ता इंगळे

नगर तालुका ः शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढला. त्यावर मात करण्यासाठी नगर तालुक्‍यात अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कामास सुरवात केली. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्‍यात येत आहे.

ग्रामीण भागातील लक्षणे दिसणाऱ्यांची कोरोना तपासणी करणे, स्वॅब घेतल्यावर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, औषधोपचार, समुपदेशन करणे, मृतांवर अंत्यसंस्कार करणे, याबाबत नगर तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवला. त्यामुळे रुग्णांची गैरसोय कमी झाली. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन केल्याने, त्याचाही परिणाम रुग्णसंख्या घटण्यावर झाला. मागील आठवड्यात साडेतीनशेच्या वर गेलेली रुग्णसंख्या आज दोनशेच्या खाली आणण्यात यश आले आहे.

हेही वाचा: अॉक्सीजन वाटपाचं ठरलं, प्रत्येकाला मिळणार १० सिलिंडर

तहसीलदार उमेश पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन धाडगे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. ज्योती मांडगे-गाडे यांच्यासह नगर तालुक्‍यातील महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, पंचायत समितीच्या सभापती सुनीता संदीप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, रामदास भोर, रवींद्र भापकर यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी, गावोगावचे गावपुढारी, सरपंच आपापल्या गावात झपाटल्यागत काम करीत आहेत. त्यांच्या पुढाकारानेच हे यश मिळाले आहे.

नगर तालुक्‍यात उपलब्ध असलेले कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने तपासण्यांचा वेग वाढवला. प्रारंभी रुग्णसंख्या जास्त वाटत होती; मात्र कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमुळे रुग्णसंख्या कमी करण्यात यश आले.

- प्रवीण कोकाटे, शिवसेनेचे युवा नेते, नगर तालुका

ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित

नगर तालुक्‍यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयाने कोरोना संकटात चांगले काम सुरू आहे. त्यासाठी ग्रामस्थांची साथही महत्त्वाची आहे. तपासणी, लसीकरण व शासनाच्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

- डॉ. ज्योती मांडगे-गाडे, तालुका आरोग्याधिकारी

 • . तालुक्‍यातील कोविड सेंटर 5

 • . विलगीकरण कक्ष 80

 • . स्वॅब संकलन केंद्रे 9

 • . लसीकरण केंद्रे 50

 • . लसींचा साठा 17 हजार

 • . रोज देण्यात येणाऱ्या लसी 900

 • . अँटिजेन व रॅपिड तपासणी केंद्रे 50

 • . आरोग्य अधिकारी, कर्मचारी 216

 • . पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 16 हजार 986

 • दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या एक हजार 728

 • . एकूण रुग्णसंख्या आठ हजार 915

 • . ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या एक हजार 753

 • . एकूण मृत्यू 193.