तर महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तर महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन

अहमदनगर : ...तर महसूलमंत्र्यांच्या दारात आंदोलन

श्रीगोंदे : तालुक्यातील मढेवडगावातील पाणंद रस्ता व बाजारतळाच्या जागेवरील अतिक्रमणे काढण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने पारदर्शक मोजणी करून, तहसीलदारांनी अतिक्रमणे काढली नाहीत तर संगमनेर येथे महसूलमंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा मढेवडगाव ग्रामस्थांनी दिला.

गावातील अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामस्थांनी नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरपंच महानंदा मांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे व भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संदीप गोसावी यांनी अतिक्रमण हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्वासनाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा: राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान?

रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे म्हणाले, की राज्य सरकारने पाणंद रस्ते, शिव रस्ते व शेती रस्ते मोकळे करण्यासाठी विविध योजना आणल्या. प्रत्यक्षात महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या निष्क्रियतेमुळे या योजना कागदोपत्रीच दिसत आहेत.

सरपंच मांडे, अंबादास मांडे, गेना मांडे, साहेबराव उंडे, संदीप मांडे, राजेंद्र उंडे, राजेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, गणेश मांडे, अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, बापू बर्डे, काळूराम ससाणे, भगवान धावडे, वामन मांडे, प्रवीण वाबळे, बापू गाडे, संजय गाडे, त्रिंबक मांडे, उत्तम मांडे उपस्थित होते.

loading image
go to top