नगरमधील व्यापा-यांसाठीही आहे 'गुड न्युज'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तीन टप्प्यांत नगर शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा खुल्या करण्यात येणार आहेत. यात सोशल डिस्टन्सचे पालन झाल्याचे आढळून आले नाही तर बाजार केव्हाही बंद करण्याचे आदेशही महापालिका आयुक्‍तांनी काढले आहेत.

नगर : गेल्या दोन महिन्यांपासून कोरानाच्या धरतीवर शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली आहे. मात्र, आता व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी आयुक्तांकडे विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे केली आहे. यानंतर महापालिका आयुक्तांच्या दालनात आमदार जगताप व व्यापारी यांच्या बैठक झाली. आमदार जगताप व व्यापाऱ्यांच्या मागणीला महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तीन टप्प्यांत नगर शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा खुल्या करण्यात येणार आहेत. यात सोशल डिस्टन्सचे पालन झाल्याचे आढळून आले नाही तर बाजार केव्हाही बंद करण्याचे आदेशही महापालिका आयुक्‍तांनी काढले आहेत. 

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून कोरानामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा दंडाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार दोन महिन्यांपासून आजपर्यंत आमचे उद्योग व्यवसाय बंद आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड झोन असून सुध्दा तेथे उद्योग व्यवसायास 20 मे पासून परवानगी देण्यात आली आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून शहरातील बाजारपेठ कापडबाजार, रेडीमेड, सोने - चांदीचे शोरुम, भांडी, इलेक्‍ट्रीकल, इलेक्‍ट्रॉनिक, फर्निचर, स्टेशनरी, कटलरो, फळ विक्री आदी सर्व प्रकारची उद्योग व्यवसाय आहेत. हे व्यवसाय आता बंद ठेवणे सर्वदृष्टीने अवघड झाले आहे. याचा विपरीत परिणाम नगर शहराच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्केटमधील असलेले शेकडो सेल्मन, कर्मचारी यांचेसुध्दा घरी असून आर्थिक उन्नती थांबली आहे. प्रशासनाने आता अटी व शर्तीचा अवलंब करुन आजपासून आमचे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

तसेच नियमांचे पालन करुन सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यात येतील, ग्राहकांची गैरसोय होवू नये यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येईल. ग्राहकांना पूर्णपणे सॅनिटाइझ करुनच शोरुनमध्ये प्रवेश दिला जाईल, मास्क असल्याशिवाय त्यांना शोरुमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, 5 पेक्षा जास्त ग्राहकांना शोरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारची नियमावली पाळली जाईल असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले आहे. 

यावेळी अहमदनगर होलसेल फुटवेअर मर्चंटस असोसिएशन, अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटना, माणिक चौक व्यापारी संघटना, महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन, नवीपेठ, अर्बन बॅंक रोड, शहाजीरोड व्यापारी महासंघ, वंदे मातरम युवा प्रतिष्ठाण आदीचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते. 

हे आहेत तीन टप्पे 
महापालिका आयुक्‍त मायकवार यांनी आदेश काढून नगर शहरातील बाजारपेठ नागरिकांची गर्दी पाहून तीन टप्प्यांत सुरू करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार बाजारपेठेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेतच उघली जातील. बुधवारी शहाजी रस्ता, कापडबाजार, नवीपेठ येथील, गुरुवारी चितळे रस्ता, लक्ष्मी कारंजा, माणिक चौक, जुना कापड बाजार, अर्बन बॅंक रस्ता येथील तर शुक्रवारी सारडा गल्ली, मोची गल्ली, गंजबाजारातील दुकाने उघडतील. या कालावधीत व्यापारी व ग्राहकांना सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा आदी शासकीय नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. शासकीय नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्यास त्वरीत बाजारपेठा बंद करण्यात येतील असेही महापालिका आयुक्‍तांनी सांगितले आहे. 
 

शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काम करतो. गेली दोन महिन्यांपासून दुकानदार त्यांना काम नसतानाही पगार देत आहेत. मात्र या लॉकडाउनमुळे दुकानेच सुरू नसल्याने कामगारांचे वेतन थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने मुख्य बाजारपेठा सुरू करणे आवश्‍यक आहे. 
- आमदार संग्राम जगताप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is also 'good news' for city traders.