esakal | राहाता शहर रोज सकाळी खुले, दुपारनंतर लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन

राहाता शहर रोज सकाळी खुले, दुपारनंतर लॉकडाउन

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

राहाता ः कोविड संसर्गाचा फैलाव आटोक्यात ठेवण्यासाठी शहरात रोज सायंकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवायची आणि दर गुरुवारी ‘जनता संचारबंदी’ पाळायची, असा निर्णय नगराध्यक्ष ममता पिपाडा, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण व व्यापारी मंडळींच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस डॉ. राजेंद्र पिपाडा, व्यापारी प्रतिनिधी सराफ अशोक बोऱ्हाडे, पारस पिपाडा, सुनील धाडिवाल, वीरेश रुणवाल, मयूर कुंभकर्ण, विलास गोठी, तसेच पदाधिकारी विजय सदाफळ, गणेश सोमवंशी, विजय मोगले, दिलीप वाघमारे, गणेश जाधव, भीमराज निकाळे, सचिन मेहेत्रे, किरण वाबळे, दशरथ तुपे उपस्थित होते. (There will be daily lockdowns in Rahata city)

बैठकीपूर्वी सराफ अशोक बोऱ्हाडे आणि त्यांच्या सहकारी व्यापाऱ्यांनी शहरातील दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवायची व दर गुरुवारी ‘जनता संचारबंदी’ पाळली जावी अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ममता पिपाडा व मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना दिले. त्यानंतर त्यावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

हेही वाचा: व्यापारी गौतम हिरण हत्याकांडाचे दोषापत्र दाखल

नगराध्यक्ष पिपाडा म्हणाल्या, की शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेला हा निर्णय नगर जिल्ह्याला दिशादर्शक ठरणार आहे. डॉ. पिपाडा म्हणाले, की कोविड आपत्तीत आपण शहरवासीयांसाठी शक्य ते सर्व काही केले. रुग्णवाहिका व बेड मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.

सराफ अशोक बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘दर गुरुवारी दुकाने बंद ठेवायची व रोज सायंकाळी चार वाजेपर्यंतच व्यापार करायचा, असा निर्णय शहरातील व्यापाऱ्यांनी एकजुटीने घेतला. कोविड फैलाव रोखण्यास यामुळे मदत होईल.’’

कोविड संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी पालिकेच्या वतीने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

- ममता पिपाडा, नगराध्यक्ष, राहाता

व्यापारी व विक्रेत्यांच्या सातत्याने कोविड चाचण्यांना प्राधान्य देणारी राहाता ही जिल्ह्यातील एकमेव नगरपालिका आहे.

- चंद्रकांत चव्हाण, मुख्याधिकारी, राहाता

(There will be daily lockdowns in Rahata city)