esakal | चोरांची प्रायोरिटी बदलली....कर्जतमध्ये लुटला सॅनिटायझरचा ट्रक
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves' priority changed Sanitizer truck stolen in Karjat

ट्रकमधील चालक व क्लिनरला गाडीतून खाली उतरवून बेदम मारहाण केली. चोर ट्रक घेऊन सोलापूरच्या दिशेने पसार झाले. अशी फिर्याद मनीवेल पेरूमल ( वय - 52) मुथ्थू हापटटी (तालुका जिल्हा नामक्कल तामीळनाडू) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांविरोधात कर्जत पोलिसात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरांची प्रायोरिटी बदलली....कर्जतमध्ये लुटला सॅनिटायझरचा ट्रक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : किमती वस्तूंची वाहने लुटल्याच्या बातम्या एेकल्या असतील. परंतु कर्जत तालुक्यात वेगळ्याच वस्तूंची लूट झाली. लॉकडाउनच्या काळात ज्या सर्वसामान्यांना वस्तू माहिती नव्हत्या. त्या वापरात आल्या. कोरोनामुळे हँडवॉश, मास्क, सॅनिटायझरचा प्रचंड प्रमाणात खप वाढला. त्यामुळे त्यांच्या किंमतीही गगनाला भिडल्या. एवढेच नव्हेतर मागणी मोठया प्रमाणात वाढल्याने त्या वस्तू दुर्मिळ झाल्या. त्यामुळे चोरांची आता प्रायोरिटी बदली आहे. सोने, पैशासाठी दरोडा घालणारे आता वेगळ्याच वस्तूंच्या लुटीकडे वळले आहेत.

हेही वाचा - पारनेर तालुक्यात जवानाचा ठेचून खून, सोयरीक नडली

नगर-सोलापूर महामार्गावर तालुक्यातील पाटेवाडी शिवारात एक मालट्रक चोरांनी अडवली. चालक व क्लिनरला मारहाण करून बत्तीस लाख रुपयांची लूट केली. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल (बुधवारी )रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मालमोटार (नंबर - टी एन - 28 बी ए 1694)नगर येथून सोलापूरकडे चालली होती. तो तालुक्यातील पाटेवाडी शिवारातील वळणावर चोरांनी अडवला. तेथील गतीरोधकाचा गैरफायदा घेऊन दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघा जणांनी ट्रक अडवला.

ट्रकमधील चालक व क्लिनरला गाडीतून खाली उतरवून बेदम मारहाण केली. चोर ट्रक घेऊन सोलापूरच्या दिशेने पसार झाले. अशी फिर्याद मनीवेल पेरूमल ( वय - 52) मुथ्थू हापटटी (तालुका जिल्हा नामक्कल तामीळनाडू) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार जणांविरोधात कर्जत पोलिसात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.

जाणून घ्या - महाविकास आघाडीचे सरकार पाडायला कोण टपलंय

या ट्रक मध्ये 21लाख 90हजार रुपये किमतीच्या सॅनिटाइजर बाटल्या होत्या. 10 लाख रुपये किमतीचा ट्रक अशी एकूण बत्तीस लाख रुपयांची लुट करण्यात आली. आज दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड  कर्मचारी उपस्थित होते. 

गेल्या तीन महिन्यांपासून  कोरोनामुळे राज्यात लाॅक डाऊन होते. यामुळे महामार्गवरील सर्व वाहतूक बंद होती. लाॅकडाऊन उठताच रस्ता लुट करणारे सक्रीय झाले आहेत. कर्जत तालुक्यातील रस्ता लूट थांबवणे हे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. 

loading image
go to top