थुंकी पडली साडेतेरा लाखांना ! 

Thirteen and a half lakhs spit
Thirteen and a half lakhs spit

नगरः कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केली असताना काही महाभाग बिनधास्त मास्क न वापरता भटकताना, तर काही सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाचा आदेशाचे उल्लंघन करून सर्रास थुंकताना आढळून आले, अशा तीन हजार 429 जणांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत तब्बल 13 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून पोलिस, आरोग्य, महसूल कर्मचारी कोरोनाला लगाम लावण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहे. 12 मार्चला जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. स्वच्छतेची दक्षता, सोसल डिस्टन्सिंगचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. विनाकारण घराबाहेर पडणे, गर्दी करणे यास मनाई केली. कोरोनावर मात करणारे औषध अधिकृतपणे निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यावरच भर राहणे, हे सहाजिकच आहे. याच दृष्टीकोनातून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई केली असून चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी 20 एप्रिलला दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट केले. आदेशाची अंमलबजावणी करीत उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने तीन हजार 429 जणांवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरल्याबद्दल दोन हजार 779 जणांकडून 12 लाख 26 हजार 480 रुपयांचा, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 650 जणांकडून एक लाख 41 हजार 120 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे ही प्रसार रोखण्याची जबाबदारी आहे. नागरिकांना जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हाच दंडात्मक कारवाई करण्यामागचा हेतू आहे. नागरिकांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com