पारनेच्या कोठडीतील तेराजणांना कोरोनाची बाधा

मार्तंड बुचुडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पारनेरच्या पोलीस कोठडीत तब्बल 53 कैदी आहेत. यातील एका कैद्यास दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या नंतर..

पारनेर : पारनेरच्या पोलिस कोठडीतील 53 पैकी थेट 13 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपुर्वी एका कैद्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या मुळे कोठडीतील सर्वच कैद्यांची आज (ता. 1) तपासणी केली, त्या हा प्रकार उघडकीस आला. आज या कैद्यांची रॅपीड टेस्ट घेतली असता 13 कैद्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

पारनेरच्या पोलीस कोठडीत तब्बल 53 कैदी आहेत. यातील एका कैद्यास दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्या नंतर आज प्रशासनाने सर्वच कैद्यांची तपासणी करण्याचे ठरविल होते. त्यानुसार आज सकाळी पोलीस कोठडीत असलेल्या उरलेल्या   सर्वच कैद्यांची कोरोनाची रॅपीड टेस्ट घेण्यात आली.

हेही वाचा - आम्हाला दम देऊ नका...सुजय विखे पाटलांनी सुनावले

या वेळी  12 कैद्यांचे अहवाल कोरोना पझिटिव्ह आले आहेत, अशी माहीती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. पूर्वीचा एक व आज 12 असे तब्बल 53 पैकी 13 कैद्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उर्वरीत कैद्यांमध्ये भितीचे वातावरण परसरले आहे. कैद्यांसह पोलीस व प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. 

पारनेर येथे पोलीस कोठडीत कैद्यांसाठी फक्त चारच खोल्या आहेत.  एका खोलीत सहा आरोपी ठेवावेत असा दंडक आहे. त्यामुळे या ठिकाणी  या चार खोल्यांमध्ये फक्त 24 आरोपींना ठेवणे गरजेचे होते. मात्र पोलीस प्रशासन व सर्वच अधिकारी यांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणाच परिणाम येथे  24 ऐवजी तब्बल 53 आरोपींना कोंडले आहे. 

सुपे येथे पोलीस ठाणे होऊन अनेक वर्ष झाली तेथे पोलीस कोठडीचीही सोय करण्यात आली आहे. मात्र, ही पोलीस कोठडी गेले अनेक दिवसांपासून मोकळीच आहे. येथे अद्यापि ऐकाही आरोपीस ठेवले नाही.

प्रमाणापेक्षा जास्त कैदी 

आरोपीसुद्धा माणसंच असतात, याचा विचार पोलीस करतील का असा प्रश्न अाता उपस्थित होत आहे. एका खोलीत सहा ऐवजी थेट 12 किंवा 13 म्हणजे थेट दुप्पट आरोपींना ठेवले आहे. जर एका खोलीत सहाच आरोपी असते तर कदाचित ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कैद्यांना कोरोनाची बाधा  झाली नसती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen in Parrne's cell contracted corona disease