नगरमधील तिघे कोरानामुक्त !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 77 वर पोहचली आहे. आठ जणांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनेची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  

 नगर ः जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत कोरोना चाचणीची आजपासून खऱ्या अर्थाने सुरवात झाली. 15 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासण्यात आले. त्यातील दहा अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित नमुने पुन्हा तपासणार आहे. दरम्यान, आज आणखी तीन जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यात नगर शहरातील सुभेदार गल्ली दोन, तर वंजारगल्लीतील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे सर्व व्यक्ती कन्टेमेंट झोनमधील असल्याने त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 52 वर पोहचला असून नगरवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा ः राज्यात असं पहिल्यांदाच घडतंय...पुण्या-मुंबईहून येणाऱ्यांसाठी जामखेडमध्ये झालाय हा निर्णय 

जिल्हा रुग्णालयातील कोविड-19 चाचणी प्रयोगशाळेस काल (शुक्रवार) आयसीएमआरकडून मान्यता मिळाली. त्यानंतर आवश्‍यक लॉगिन आयडीही प्राप्त झाला. मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू करण्यात आले. 

अवश्‍य वाचा ः काय म्हणाव यांना...सवलत दिली की उसळली 

खबरदारीच्या उपाययोजनेची अंमलबजावणी करा 
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 77 वर पोहचली आहे. आठ जणांचा आजअखेर मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनेची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three coranamuktas in the city