

Ahilyanagar Police nab three accused involved in the ₹8.80 crore digital arrest cyber fraud racket.
Sakal
अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील एकाला डिजिटल अरेस्ट करत सुमारे आठ कोटी ८० लाख रुपयांची आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विजय रंगनाथ चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर), अभिजित अजिनाथ गिते (रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. प्रतीक प्लाझा, जेएसपीएम कॉलेजजवळ, पुणे) व अक्षय संजय तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासे, हल्ली रा. द्वारका पॅलेस, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.