esakal | अहमदनगर : 3 तालुक्‍यांनी ओलांडली कोरोना रुग्णसंख्येची शंभरी
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

नगर : 3 तालुक्‍यांनी ओलांडली कोरोना रुग्णसंख्येची शंभरी

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी नवे ९१८ कोरोनाबाधित आढळून आले. संगमनेर, कर्जत व पारनेर या तीनही तालुक्‍यांत कोरोनाबाधितांचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या तीनही तालुक्‍यांनी रुग्णसंख्येची शंभरी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बाधितांची वाटचाल तीन लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या दोन लाख ९८ हजार १६० झाली आहे. दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाला. (three-talukas-crossed-number-of-corona- patients-jpd93)

पाच हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरू

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटांमध्ये संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. आता पुन्हा संगमनेरातच रुग्णांचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १०९ रुग्ण तेथे आढळले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पारनेर तालुक्‍यात रुग्णांची संख्या जास्त होती. कर्जत तालुक्‍यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे. दोन्ही तालुक्‍यांमध्ये प्रत्येकी १०२ रुग्ण आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १२१, खासगी प्रयोगशाळेत ४१८, तर रॅपिड अँटिजेन चाचणीत ३७९ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या दोन लाख ९८ हजार १६० झाली आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढण्यास सुरवात झाली आहे. दिवसभरात सरासरी दहा ते पंधरा रुग्णांचे मृत्यू होत आहेत. शुक्रवारी दिवसभरात दहा रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सहा हजार १६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ७७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत दोन लाख ८६ हजार ३०८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः संगमनेर १०९, पारनेर १०२, कर्जत १०२, श्रीगोंदे ६३, पाथर्डी ६६, जामखेड ६७, शेवगाव ९३, नगर तालुका ४७, नेवासे ३४, कोपरगाव ३०, श्रीरामपूर ३०, राहाता ४२, राहुरी ३७, अकोले ४६, नगर शहर २४, भिंगार तीन रुग्ण. परजिल्ह्यांतील २३ रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा: किमान स्वतःच्या जिवाची तरी चिंता करा; जिल्हाधिकारी संतापले

हेही वाचा: अहमदनगर : निर्बंध कायम, मात्र वरखेड जत्रेत मोठी गर्दी!

loading image
go to top