श्रीरामपूर तालुक्‍यात तीन शिक्षक कोरोनाबाधित

गौरव साळुंके
Sunday, 22 November 2020

राज्य सरकारच्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य सरकारच्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, शनिवारी घेतलेल्या तपासणीत तालुक्यातील तीन शिक्षक बाधित आढळून आले. 

तालुक्‍यातील उक्कलगाव, अशोकनगरसह कोपरगाव येथील प्रत्येकी एका शिक्षकाचा त्यांत समावेश आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. तालुक्‍यात सध्या 37 कोरोनाबाधित असून, ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : पोलिसांनी जप्त करायला दिलेल्या गो-मांसाची महापालिका कर्मचाऱ्यांकडून परस्पर विक्री
येत्या सोमवारपासून (ता. 23) नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील 350 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तालुक्‍यात 800हून अधिक शिक्षकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, आरटीपीसीआर तपासणीसाठी रोज केवळ 50 किट उपलब्ध होत असल्याने, या चाचण्या लांबल्या आहेत. 

आरोग्य विभागाने बुधवारपासून (ता. 18) शिक्षकांच्या कोरोना तपासण्या सुरू केल्या. त्यासाठी 200 किटची मागणी केली असली, तरी रोज केवळ 50 तपासणी किट उपलब्ध होत आहेत. शिरसगाव येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहामध्ये आज 80 आरटीपीसीआर, तर 64 रॅपिड, अशा एकूण 144 जणांची चाचणी झाली. त्यात पाच बाधित आढळले. आरोग्य विभागाने तालुक्‍यातील 350 शिक्षकांच्या कोरोना तपासण्या केल्या असून, त्यांत तीन शिक्षक बाधित आढळले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three teachers in Shrirampur taluka were corona positive