तीन पर्यटक बुडाले

अकोल्यातील कृष्णावंती नदीतील दुर्घटना
Three tourists drowned in Krishnavanti river in Akole
Three tourists drowned in Krishnavanti river in Akole

अकोले - कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार-घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या वाहनाला काल रात्री साडेआठ वाजता अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट कृष्णावंती नदीपात्रात बुडाली. या अपघातात दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याच वेळी बोलेरोमधून आलेला एक वृद्ध पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसीबीने वाहन बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

औरंगाबाद येथील वकिली करीत असलेले आशिष प्रभाकर पोलादकर (वय ३४ रा. पोलादपूर, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (३७, रा. ताड पिंपळगाव, ता. कन्नड), ॲड. अनंत रामराव मगर (वय ३६, रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते.

कार्यक्रमानंतर भंडारदरा पर्यटनासाठी आले होते. त्यांना भंडारदरा येथे जायचे होते. मात्र, रस्ता चुकला. ते सरळ वाकीमार्गे वारुंघुशी फाट्याच्या पुढे गेले. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता कळसूबाईकडून भंडारदऱ्याच्या दिशेने येत होते. यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कृष्णावंती नदीपात्रात पडून बुडाली. त्याच वेळी बोलेरोमधून आलेला एक प्रवासी लघुशंकेसाठी थांबला होता. नदीच्या प्रवाहात तोही वाहून गेला. आज शनिवारी त्याचा शोध सुरू होता.

ही घटना परिसरातील शेंडी येथील राजू बनसोडे, दीपक आढाव या दोन युवकांनी पाहिली. त्यांनी तत्काळ राजूर पोलिसांना फोन केला. राजूर पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यावेळी दहा वाजले होते. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा होता. त्याची पर्वा न करता अंधारात सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, हेडकॉन्स्टेबल काळे, दिलीप डगळे, अशोक गाडे, विजय फटांगरे आदी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्री साडेदहा वाजता अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढली.

औरंगाबादहून आले होते पर्यटनासाठी

अॅड. आशिष पालोदकर हे अविवाहित होते. ते खडकेश्वर येथे आई-वडिलांसह राहत होते. ते औरंगाबादच्या जिल्हा कोर्टात वकिली करीत होते. रमाकांत देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. ते शेती करायचे. वाचलेला मित्र अनंत आपल्या मित्रांचे मृतदेह पाहून ओक्साबोक्शी रडू लागला व बेशुद्ध पडला. त्याच्यावर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com