पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

न्यायालयाचे वॉरंट बजावण्यास गेला होता पोलिस कर्मचारी
ahmedngar
ahmedngarsakal

अहमदनगर : न्यायालयाचे वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल देवराम मारुती गावडे (रा. गावडेवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर) यास तीन वर्ष सक्‍तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी ठोठावली.

पोलिस कर्मचारी शरद देवीदास गावडे, रत्नपारखी आणि शिंदे हे न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट बजावणीसाठी ता. 27 नोव्हेंबर 2016 रोजी ढवळपुरी (ता. पारनेर) येथे गेले होते. वॉरंटमधील आरोपी मारुती सखाराम गावडे यांच्या मुलाने पोलिस कर्मचारी शरद गावडे यांना म्हणाला की, " वॉरंटमधील आरोपी हे वडील असून ते सध्या पुणे येथे दवाखान्यात उपचार घेत आहेत.' त्यावेळेस घरात पाहणी केली असता, शेजारील घरातून एक व्यक्‍ती बाहेर आला व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागला. पोलिसांच्या दिशेने येऊन शासकीय कामात अडथळा आणला. वॉरंट हिसकावून फाडले. किसन केशव भुसारी याने देखील पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

पारनेर पोलिस ठाण्यात आरोपी देवराम गावडे व किसन भुसारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी देवराम गावडे याला सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तीन वर्ष सक्‍तमजुरी आणि सहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. के. भोसले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com