दुर्दैवी घटना! 'आंध्रप्रदेशमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा अपघातात मृत्यू'; शेवगाव तालुक्यावर शाेककळा
Devotees From Maharashtra Die in Andhra Crash : परतीच्या प्रवासादरम्यान आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार उलटून अपघात झाला आहे. त्यात सौरभ विष्णू अकोलकर, तुषार सुनील विखे, श्रीकांत थोरात हे तिघे ठार झाले, तर सुमित अकोलकर गंभीर जखमी झाला आहे.
Tragic Accident in Andhra Pradesh: 3 Youth from Shevgaon Die During Temple VisitSakal
शेवगाव : आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तालुक्यातील तीन महाविद्यालयीन तरुणांचा कार अपघातात मृत्यू झाला. तिरुपती बालाजी येथून परतत असताना अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा येथे ही घटना मंगळवारी घडली.