esakal | हरिश्चंद्रगडावरील डोहात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पर्यटकाचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Tourist drowned at Harishchandragad

हरिश्चंद्रगडावरील डोहात बुडून पर्यटकाचा मृत्यू

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. अहमदनगर) : औरंगाबाद येथील पर्यटक तरुण भटकंतीसाठी अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात आले होते. गड चढत असताना दुसरा टप्पा चढून गेल्यावर काही जण निसर्गाचे फोटो काढत होते, तर काही जण सेल्फी घेत होते. मागील आठवड्यात या परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढे-नाले भरले आहेत. गडाच्या मध्यावर डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे या तरूणाचा बुडून मृत्यू झाला.

ज्ञानेश्वर मधुकर दांडाईत (वय २१, रा. औरंगाबाद) असे या तरुणाचे नाव आहे. सोबतीला असणाऱ्या मित्रांनी त्याला बाहेर काढून गडाच्या खाली आणले व वाहनातून राजूरच्या दिशेने निघाले. ही घटना मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास घडली. राजूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी राजूर येथे वाहन आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी दिली.

हेही वाचा: दोन नोकऱ्या करत लाटले सरकारी मानधन; डॉक्टरविरोधात गुन्हा

हेही वाचा: Ahmednagar : काउंट डाऊन... प्रतीक्षा संपतेय!

loading image
go to top