

Ahmednagar police bust tractor theft gang — 9 tractors and 2 bikes worth ₹72 lakh recovered.
Sakal
अकोले / संगमनेर : शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेवून त्यांची फसवणूक करत ट्रॅक्टर पळविणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने अटक केली. पथकाने या कारवाईत नऊ ट्रॅक्टरसह दोन दुचाकी असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी संगमनेर येथे दिली आहे.