
Businessman kidnapped in Shrigonda; ransom of ₹2.5 crore demanded, ₹30 lakh paid.
श्रीगोंदे : व्यापाऱ्याचे अपहरण करीत जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे अडीच कोटींच्या खंडणीची मागणी करीत ३० लाख ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी प्रशांत देविदास मते (वय ४३, रा. शिर्डी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जगताप, अजय शेळके व शुभम रामचंद्र महाडिक यासह सात ते आठ जणांविरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुभम महाडिक यास अटक केली आहे.