esakal | अहमदनगर : तब्बल 61 गावांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन; संतप्त व्यापाऱ्यांचा ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

अहमदनगर : तब्बल 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन; व्यापारी संतप्त

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (coronavirus) संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. संसर्ग वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांत (lockdown in ahmednagar district) पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाही कामाला लावण्यात आली आहे.

शाळा आणि मंदिरेही खुली होणार नाहीत

नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही खुली होणार नाहीत. अशावेळी प्रशासासोबतच गावकऱ्यांनीही ही बाब गांभीर्याने घेतली असून बहुतांश गावात कडकडकीत बंद पाळण्यात आला आहे. जिल्ह्यातील भाळवणी, गोरेगाव, भाळवणी, जामगाव, दैठणे गुंजाळ या गावांमध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या झाल्यामुळे दहा दिवसाचे लाॅकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. याबाबत कान्हुर पठार येथील संतप्त व्यापाऱ्यांनी याचा निषेध व्यक्त करत गावामध्ये ठिय्या आंदोलन केले. गावठाणमध्ये एकही रूग्ण नाही. परिसरातील गावातील रूग्ण गावामध्ये गृहीत धरल्याने आकडेवाडी वाढली आहे.

हेही वाचा: अहमदनगर : नामोल्लेखाचा वाद चिघळण्याची भीती

पुन्हा नव्याने लाॅकडाऊन; संतप्त व्यापारांचा ठिय्या

गावठाण मध्ये कोरोनाचा एकही रूग्ण नाही मागील दहा दिवस व पुन्हा नव्याने दहा दिवसाचे लाॅकडाऊन केल्याने कान्हुर पठार येथील संतप्त व्यापारी वर्गाने आज (ता.४) गावामध्ये ठिय्या आंदोलन केले. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन लाॅकडाऊन पाळण्याच्या सुचना दिल्या. शुक्रवार पर्यंत गावातील बरे झालेले व सद्यस्थितीत असलेल्या रूग्णांची आकडेवाडी काढण्यात येईल त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून लाॅकडाऊन बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रांतधिकारी सुधाकर भोसले यांनी लाॅकडाऊन पाळण्याबाबत सुचना दिल्या. शुक्रवार पर्यंत जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांना अहवाल सादर करण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा: MPSC : अजित पवारांनी अखेर शब्द पाळला! विद्यार्थ्यांमध्ये आनंद

अशी आहेत लॉकडाऊन गावे

संगमनेर तालुका : गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी.
श्रीगोंदा तालुका : लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी


पारनेर तालुका : वडनेर बुद्रुक, कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी.


अकोले तालुका : लिंगदेव, वीरगाव, परखतपूर


कर्जत तालुका : खांडवी, बाभुळगाव दुमाला


कोपरगाव तालुका : गोधेगाव

या गावांचा समावेश नाही

जिल्ह्यातील प्रमुख देवस्थाने असलेल्या शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहाटा देवी, मढी, राशीन, बुऱ्हाणनगर, केडगाव या गावांचा यात समावेश नाही, ही समाधानाची बाब आहे.

loading image
go to top