
नगर तालुका: घरासमोर खेळत असलेल्या सात वर्षाच्या बालकाला भरधाव वेगातील कारने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. पोखर्डी येथे पिंपळगाव उज्जैनी जाणाऱ्या रोडच्या कडेला ८ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घटना घडली. अथर्व नंदू सुसे (वय ७, रा.पोखर्डी, ता. नगर) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे.