A tragic road accident occurred in Rahuri when a family travelling to a nephew’s wedding met with a severe mishap
Sakal
अहिल्यानगर
दुर्दैवी घटना! 'भाच्याच्या लग्नाला निघालेल्या मामीचा मृत्यू'; राहुरीत काळाचा घाला, मामासह तीन महिला जखमी
Accidental Death case : जोरदार धडकेमुळे मामीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून आनंदाचे वातावरण दु:खद बनले आहे.
राहुरी: राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर एका कारला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण किरकोळ जखमी झाले. लक्ष्मीबाई बाळासाहेब साळवे (वय ४७, रा. बारागाव नांदूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी ११ वाजेदरम्यान घडला.

