
-मार्तंड बुचुडे
पारनेर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाघुंडे बुद्रुक नजीक एसटी बसची कारला जोराची धडक बसल्याने कारचालक मनोहर दादाभाऊ काळोखे (वय ५२, रा. पानोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काळोखे हे सुपे येथील रहिवासी व मूळचे पानोली येथील आहेत ते निघोज येथे जिल्हापरिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते.