Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक
Tragic Bike Accident: रामभाऊ गोरक्षनाथ सुपेकर (वय ५१, रा. खडांबे खुर्द) असे मृताचे नाव आहे. वसीम खान असे जखमीचे नाव आहे. रविवारी दुपारी बारा वाजता दुचाकीस्वार सुपेकर राहुरीहून वांबोरीच्या दिशेने, तर दुचाकीस्वार वसीम खान वांबोरीकडून राहुरीच्या दिशेने भरधाव वेगाने चालले होते.
राहुरी : वांबोरी हद्दीत रविवारी (ता. १४) मुनोत पेट्रोल पंपाजवळ राहुरी वांबोरी-रस्त्यावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, एका जण गंभीर जखमी झाला.