

Shrirampur Shocker: 17-Year-Old Girl and Man Found Dead on Railway Tracks
sakal
श्रीरामपूर : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरात यादवबाबा मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकवर प्रेमीयुगुलानी रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ३) पहाटे उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश बाबासाहेब फरगडे (वय २६, रा. संजयनगर परिसर) व श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी यांनी खंडाळा शिवारातील यादवबाबा मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले.