
अहिल्यानगर : नगर-पुणे महामार्गावर केडगाव उपनगरात रंगोली हॉटेल चौकात भरधाव वेगात आलेल्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २८) रात्री ११.५० च्या सुमारास घडली. सतीश चंदू वाघ (वय ३०, रा. पिंपळगाव माळवी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.