आदिवासी राहीबाई करणार संसदेला संबोधित, बीजबँकेच्या निर्मितीचा उलगडणार प्रवास

शांताराम काळे
Sunday, 17 January 2021

आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणारा आहेत. १९ जानेवारी रोजी दुपारी बारावाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल.

अकोले : संसदेच्या इतिहासात एक वेगळीच घटना घडत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी महिला खासदारांना संबोधित करणार आहे. येत्या एकोणवीस तारखेला हा अनोखा योग येत आहे. अर्थातच ती साधीसुधी नाही तर पद्मश्री किताब मिळवणारी महिला आहे. राहीबाई सोमा पोपेरे असं तिचं नाव.

आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणारा आहेत. १९ जानेवारी रोजी दुपारी बारावाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल. पुढील एक तासभर ते सुरू राहील.

हेही वाचा - नेवाशातील मुस्लिम नवदाम्पत्याने जे केले ते तुम्हाला जमेल काय

त्या आपल्या जीवन प्रवासाबद्दल लोकसभा सदस्यांना माहिती देतील .या संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. ते लोकसभा पोर्टल वर व चॅनलवर ही दाखवले जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर सीमा कौल सिंह यांनी दिली.

काय आहे काय राहीबाईंचे काम

आजपर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदिवासी गावातील राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक आपल्या राहत्या घरी छोट्याशा झोपडीत बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने सुरू केली होती.

बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन सन 2014 सली करण्यात आले होते. त्यानंतर राहीबाई यांचा प्रवास सातत्याने गरीब शेतकऱ्यांसाठी बीजनिर्मिती व वितरण करून सुरू आहे. त्यासाठी बायफ संस्थेच्या मदतीने कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देश पातळीवरील बीजी संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आली आहे.

आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित राहीबाई यांनी आपले जीवन देशी बियाणे संवर्धन करण्यासाठी समर्पित केले. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार यापूर्वी प्रदान करण्यात आला आहे.

पद्मश्री पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना ते काय मार्गदर्शन करणार आहेत. हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बायफ या संस्थेने सुरू केलेल्या देशी बीज संवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशातही घेतली आहे.

गावोगावी प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर राहीबाई व बायफची तज्ज्ञ टीम येत्या 19 तारखेला लोकसभा सदस्यांना काय संबोधित करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषय तज्ज्ञ संजय पाटील व विभागीय अधिकारी जितिन साठे हे राहीबाई पोपेरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal woman Popere will address Parliament