esakal | टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशननेही अर्णबबाबत हात झटकले
sakal

बोलून बातमी शोधा

The TV Journalists Association also shook hands with Arnab

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली. ही अटक झाल्याचे समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशननेही अर्णबबाबत हात झटकले

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली. ही अटक झाल्याचे समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, टीआरपी प्रकरणासह इतर काही प्रकरणापासुन गोस्वामी चर्चेत आले होते. त्यांना अटक झाल्यापासून राजकीय चर्चा झडत आहेत. या अटकेबाबत टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशननेही ट्विटच्या माध्यमातून भूमिका जाहीर केली आहे.
 

त्याच्या मागे उभे राहण्यापेक्षा अलिप्ततेचे धोरण घेतलं आहे. बुधवारी सकाळी अलिबाग पोलिसांकडून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांची पत्नी आणि मुलगी अक्षता नाईक हे प्रसार माध्यमांसमोर आले होते. त्यांनी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानले.
 

५ मे २०१८ हा दिवस कधीच विसरु शकत नसल्याचं अक्षता नाईक यांनी म्हटलं. चिठ्ठीत नाव लिहून कारवाई होत नव्हती, असंही नाईक यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. या बाबत टीव्ही जर्नालिस्ट एसोसिएशननेही भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक एका व्यक्तीगत प्रकरणातून झाली आहे. पत्रकारितेशी त्याचा संबध नाही. कायद्यासमोर सगळे समान असतात. त्यामुळे कायद्याला आपले काम करु द्या, न्याय व्यवस्थेतून सत्य जनतेसमोर येईलच. आम्ही पत्रकार म्हणून सत्यासोबत आहोत!