esakal | कणगरमध्ये नवरदेवासह 22 वऱ्हाडी कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

कणगरमध्ये नवरदेवासह 22 वऱ्हाडी कोरोनाबाधित

कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. विवाह समारंभ कोरोना प्रसार केंद्रे ठरू लागले आहेत.

कणगरमध्ये नवरदेवासह 22 वऱ्हाडी कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरली, लॉकडाउन (LOckdown) संपले, निर्बंध कमी झाले तसा कोरोना विषाणू हद्दपार झाल्याचा भास नागरिकांना झाला आहे. निर्बंध विसरून ते धुमधडाक्यात विवाह समारंभ (wedding ceremony) पार पडत आहेत. परिणामी, कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. विवाह समारंभ कोरोना प्रसार केंद्रे ठरू लागले आहेत. (twenty two corona patients have been found at a wedding ceremony in kangar)

हेही वाचा: परवड थांबणार : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळणार ऑनलाइन

कणगर येथे एका विवाह समारंभ झाला. त्यात नवरदेव व एक करवली कोरोनाबाधित आढळले. उपचारासाठी नुकतेच ते देवळाली प्रवरा येथे शासनाच्या सहारा कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनी विखे यांनी लग्नस्थळी कोरोना चाचणी शिबिर घेतले. ६३ जणांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या. त्यात २२ वऱ्हाडी कोरोनाबाधित आढळले.

हेही वाचा: राहुरी विद्यापीठाचा आंबा लय गोड! आमराईतून कमावले एक कोटी

देवळाली प्रवरा येथील शासनाचे सहारा कोविड सेंटर येत्या मंगळवारपासून (ता. १५) बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुका प्रशासनाने घेतला होता; परंतु विवाह समारंभातील वऱ्हाडी कोरोनाबाधित आढळल्याने जून महिनाअखेरपर्यंत कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका प्रशासनाला घ्यावा लागला, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांनी सांगितले. (twenty two corona patients have been found at a wedding ceremony in kangar)

loading image