
-विलास कुलकर्णी
राहुरी : राहुरीच्या राजकारणाने मंगळवारी रात्री अचानक वळण घेतले. ज्येष्ठ नेते अरुण तनपुरे व युवा नेते हर्ष तनपुरे पिता-पुत्राने अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ‘गोड बातमी आणि सुखद धक्का’ अशाप्रकारे दिला. त्यांच्या पक्षप्रवेशाने ‘घड्याळा’ची ताकद वाढली आहे.