

Wreckage at the accident site after a speeding truck collision that claimed two lives.
Sakal
करंजी: मिरी (ता. पाथर्डी) येथे पांढरीपूल–शेवगाव रस्त्यालगत एकनाथनगर परिसरात भरधाव उसाने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गणेश किसनराव वाघ (वय ३९) व तेजस देविदास जगताप (वय १९, दोघेही रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.