esakal | दोन मजुरांचा पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Two laborers from MIDC area in Shrirampur have died after drowning in a tank of a paper mill.jpg

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोघेंही मृत असल्याचे घोषित केले. त्यामुळे दोन्ही कुटूंबासह कामगार वर्गावर शोककळा पसरली.

दोन मजुरांचा पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर ) : येथील एमआयडीसी परिसरातील दोन मजुरांचा एका पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. मनोजसिंग दयाशंकर सिंग (वय ३५.) व प्रशांत विरेष भुतळे (वय १६, दोघेही रा. धनगरवाडी) असे मृत मजुरांची नावे असल्याची माहिती पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांनी दिली.

साईसंस्थानच्या जुन्या रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद; कर्मचारीही साईसंस्थान कोविड सेंटरमध्ये वर्ग 

प्रशांत हा आपल्या आईसोबत पेपरमिल परिसरात राहत होता. बुधवारी सांयकाळी त्याची आई शेतमजुरीचे काम आटोपून घरी परतली. त्यावेळी प्रशांत हा घरात नसल्याने आईने त्याचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास एका पेपरमिलच्या कागदी लगदा तयार केल्या जाणाऱ्या हौदात प्रशांत व मनोजसिंग याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती रात्री सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी जमलेल्या कामगारांनी दोघांनाही हौदाबाहेर काढून येथील कामगार रुग्णालयात काल रात्री उशिरा उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोघेंही मृत असल्याचे घोषित केले. त्यामुळे दोन्ही कुटूंबासह कामगार वर्गावर शोककळा पसरली.

फरार बोगस डॉक्‍टरला अटक

वैद्यकीय अहवालानुसार तालुका पोलिसांनी आज मध्यरात्री याबाबत आकस्मात मुत्यूची नोंद केली. पोलीस निरिक्षक साळवे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेवून पुढील तपास सुरु केला आहे. मृतदेहाच्या उत्तरणीय तपासणीनंतर आज दुपारच्या सुमारात शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
 

loading image