बेफिकीर संगमनेरकर ः तालुक्यात तब्बल दोन हजार कोरोनाबाधित

Two thousand corona patients in Sangamner taluka
Two thousand corona patients in Sangamner taluka

संगमनेर ः तालुक्‍यात कोरोना संक्रमणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. अवघ्या पाच महिन्यांतच प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाबाधितांची तालुक्‍यातील संख्या तब्बल 2001 वर पोहोचली आहे. 

तालुक्‍यातील आश्वी बुद्रुक येथून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग चढत्या क्रमाने आजपर्यंत दोन हजार पार झाला. सुरवातीला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली. कडक लॉकडाउन, संचारबंदी, रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहने व विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित प्रमाणात वाढली.

दरम्यानच्या काळात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. भास्कर भवर, डॉ. संदीप कचेरिया आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, "अनलॉक'नंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. 

शहरातील बाजारपेठेत गर्दी वाढल्याने गावांपर्यंत कोरोना विनासायास पोहोचला. विक्रेत्यांसह नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा विसर पडला. या बेफिकिरीमुळे अवघ्या पाच महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या 2001वर गेली असून, 28 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1677 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

117 गावांत प्रादुर्भाव 
तालुक्‍यातील 174 पैकी 117 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर, कुरण, निमोण, सिद्धकला व कॉटेज हॉस्पिटल, मौलाना आझाद मंगल कार्यालय, वसंत लॉन्स आदी ठिकाणी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून, तसेच शहरातील 18 खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 85, तर मृत्यूची टक्केवारी 1.40 आहे. मात्र, कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, नागरिकांनीच स्वतः काळजी घेण्याची गरज आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com