Rahuri Ahmednagar : उंबरे दंगल प्रकरणातील तेरा जणांना सशर्त जामीन

एका धार्मिक स्थळी तोडफोड करून, काही दुकानांवर दगडफेक.
Love Jihad umbare
Love Jihad umbareesakal

राहुरी - उंबरे येथे दंगल, दरोडा व मारहाणीच्या गुन्ह्यांतील अटक केलेल्या तेरा आरोपींना राहुरी न्यायालयाने आज (सोमवारी) सशर्त जामीन मंजूर केला.

Love Jihad umbare
Ahmednagar News : शाळेतही बनले शिंदेच मुख्यमंत्री; ‘कौन बनेगा मुख्यमंत्री',नेवासे जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

उंबरे येथे बुधवारी (ता. २६) रात्री नऊ वाजता जमावाने दोन तरुणांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती. एका धार्मिक स्थळी तोडफोड करून, काही दुकानांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी सलीम वजीर पठाण (रा. उंबरे) यांच्या फिर्यादीवरून २५ जणांसह २५ अनोळखी व्यक्ती, अशा ५० जणांविरुद्ध दंगल, दरोडा व मारहाणीचा गुन्हा नोंदविला होता.

Love Jihad umbare
Ahmadnagar News: महसूल विभाग ॲक्शन मोडवर

या प्रकरणातील आरोपी राजेंद्र मोहिते (वय २५, रा. गणेशवाडी, सोनई, ता. नेवासे), गणेश सोनवणे (वय २१, रा. श्रीरामवाडी, सोनई), शेखर दरंदले (वय ३०, रा. सोनई), सचिन बुऱ्हाडे (वय २५, रा. शिवाजी चौक, राहुरी), नवनाथ दंडवते (वय ३६, रा. ब्राह्मणी), संदीप लांडे (वय ३२, रा. लांडेवाडी, सोनई), शुभम देवरे (वय २५, रा. स्टेशन रोड, राहुरी), सुनील दाभाडे (वय २६, रा. क्रांती चौक, राहुरी), माऊली पवार (वय २२, रा. निंभारी, ता. नेवासे), प्रतीक धनवटे (वय २९, रा. तनपुरे गल्ली,

जयवंत पाषाण (वय २१), अभिजित हुडे (वय १९), कृष्णा ऊर्फ बबन मोरे (वय २१, तिघेही रा. उंबरे) आदी १३ जणांना अटक करण्यात आली होती.

राहुरी न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने आज (मंगळवारी) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना राहुरी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यावर तत्काळ त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने शर्ती व अटींसह मंजूर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com