संगमनेर: राज्यात विधिमंडळाच्या आवारात घडलेली मारहाणीची घटना, सरपंचांवरील हल्ले, तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली. तसेच या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमके चाललंय काय, हेच समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्यातील सध्याच्या अनिश्चित आणि गोंधळलेल्या वातावरणावर भाष्य केले.