विना इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माझी वसुंधरा' अभियानाअंतर्गत सायकल रॅली

मार्तंड बुचुडे
Wednesday, 30 December 2020

विना इंधन वाहन प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हरीत वसुंधरेसाठी बुधवारी सकाळी मुख्याधिकारी डॉ.कुमावत यांच्या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली.

पारनेर (अहमदनगर) : माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पारनेर नगरपंचायतीच्यावतीने विना इंधन वाहन प्रोत्साहन देण्यासाठी शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांनी केले होते. रॅलीत न्यू आर्टस कॉमर्स कॉलेजचे शिक्षक, मुले व मुली तसेच नगरपंचायतचे कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप हरीत वसुंधरेची शपथ घेऊन करण्यात आला.

हे ही वाचा : तृतीयपंथीयांचे दातृत्व! साईबाबांच्या झोळीत 11 लाखांचे दान, व्हीआयपी दर्शनही नाकारले 

विना इंधन वाहन प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हरीत वसुंधरेसाठी बुधवारी सकाळी मुख्याधिकारी डॉ.कुमावत यांच्या संकल्पनेतून ही रॅली काढण्यात आली. ही रॅली नगरपंचायत कार्यालयापासून सुरू करण्यात आली. मिलन चौक, पारनेर पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, पानोली चौक, नवीपेठ मार्गे पुन्हा नगरपंचायत कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. समारोपप्रसंगी सहभागींना हरित वसुंधरा नि्र्मितीची शपथ देण्यात आली. 

हे ही वाचा : ग्रामपंचायतीची निवडणूक नको रे बाबा; अर्ज करण्याची किचकट प्रक्रियेमुळे संताप

या रॅलीत मुख्याधिकारी डॉ.कुमावत यांच्या सह शहर अभियंते सुनिल गांगुर्डे व सचिन राजभोज, विजय मुरूमकर, राजश्री घोडके, सुप्रिया गायकवाड, महाविद्यालयाचे प्राध्यापक भारत डगळे व कॉलेजचे एनसीसीची मुले व परिसरातील शाळांमधील छोट्या मुला मुलींनी सुद्धा या रॅलीत  स्वयंस्पुर्तीने सहभाग घेतला. या रॅलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Maji Vasundhara Abhiyan Parner Nagar Panchayat has organized a bicycle rally in the city to promote non fuel vehicles