
Centre Focused on Empowering the Cooperative Sector, Says Amit Shah
Sakal
शिर्डी (जि. अहिल्यानगर): ‘‘अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तातडीने मदत करतील,’’ असा दिलासा केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी लोणी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिला.