नगर-शिर्डी मार्गावरील प्रवाशांना मंत्री गडकरी पावले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

नवी दिल्ली येथे डॉ. विखे यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव बाबत चर्चा केली व त्याचा पाठपुरावा केला. 

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला नगर शिर्डी रस्त्याची दुर्दशा चर्चेचा विषय ठरला होता. या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता त्यावरून होणाऱ्या वाहतुकीचा विचार करता, या रस्त्याची किरकोळ डागडुजी न करता मजबुतीकरण काँक्रिटीकरण व्हावे. यासाठी खासदार डॉ. सुजय विखे प्रयत्नशील होते. अक्षरश शिर्डी शिंगणापूर येथील येणाऱ्या भाविकांची परीक्षा पाहणारा शिर्डी ते अहमदनगर या महामार्गाची साडेसाती संपणार आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सदर महामार्गावरची वाहतूक लक्षात घेता व या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर या रस्त्याच्या बर्‍याच समस्या सुटतील. त्यामुळे वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही, तसा प्रस्ताव नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया मार्फत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता.  नवी दिल्ली येथे डॉ. विखे यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्ताव बाबत चर्चा केली व त्याचा पाठपुरावा केला. 

हे ही वाचा : सात मजली इमारतीचा प्रस्ताव थंड बस्त्यात; महापालिकेला मिळाले असते लाखोंचे उत्पन्न

डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या महिनाभरात हायवे अथोरिटी ऑफ इंडिया मार्फत नगर शिर्डी रस्त्याचे टेंडर केली जाणार असून, येत्या मार्चअखेर या कामास सुरुवात होईल. त्याबाबतच्या सूचना मंत्री श्री. नितींनजी गडकरी यांनी संबंधित विभागाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे रस्त्याची शुक्लकाष्ट कायमची संपेल, अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Roads and Highways Minister Nitin Gadkari has approved a proposal of Rs 500 crore for concreting and strengthening of Nagar Shirdi